Header Ads

शिरूरकासारसह जिल्ह्यातील इतर चार नगर पंचायतींचे आरक्षण सोडत २७ जानेवारीला

आरक्षण काय पडणार याकडे सर्वांचे लक्ष

शिरूरकासार | प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील ५ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची सोडत गुरुवार २७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. मुंबई मंत्रालय येथे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या सोडतीकडे जिल्ह्यातील मतदारांचे लक्ष लागलेले आहे.

महाराष्ट्रातील १३९ नगरपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. या निवडणुकांच्या निकालानंतर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण काय पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महिन्याभरात आरक्षण सोडत होऊन नगराध्यक्ष विराजमान करणे आवश्यक आहे. दरम्यान या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांच्या आरक्षणाची सोडत नगर विकास विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. ही आरक्षणाची सोडत गुरुवार २७ जानेवारी रोजी सायं. ४ वा. मुंबई मंत्रालयात प्रधान सचिव यांच्या कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. बीड जिल्ह्यातील शिरूरकासार, आष्टी, पाटोदा, वडवणी आणि केज या ४ नगरपंचायतींचे आरक्षणही या वेळी जाहीर होणार आहे. या आरक्षण प्रक्रियेकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.