Header Ads

महेबूब शेख प्रकरणाला कलाटणी; पीडितेने घेतला यु टर्न !

आमदार सुरेश धस आणि चित्रा वाघ अडचणीत येण्याची शक्यता
----
औरंगाबाद | प्रतिनिधी

मालेगाव येथील एका नगरसेवकाच्या दबावाखाली महेबूब शेख यांच्यावर आपण बलात्काराचा गुन्हा दाखल केला असल्याचे तसेच या कटात आष्टीचे आमदार सुरेश धस आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा समावेश असल्याचा सनसनाटी आरोप या प्रकरणातील पीडितेने केला असून तशी फिर्याद मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पीडितेने दिली आहे. त्यामुळे आ. धस आणि चित्रा वाघ अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे राज्य अध्यक्ष महेबूब शेख यांच्यावर डिसेंबर 2020 मध्ये बलात्काराचा गुन्हा औरंगाबाद येथे दाखल झालेला आहे. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. तसेच या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाचा असल्याने तपास यंत्रणा योग्य प्रकारे तपास करीत नसल्याचा आरोप देखील वितोधकांकडून होत होता. न्यायालयाने देखील अयोग्य तपासाचा ठपका ठेवत तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले होते. मात्र, आता पीडितेने यु टर्न घेतला आहे.O

महेबूब शेख यांच्यावर अत्याचाराचा आरोप करणाऱ्या युवतीने जिन्सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत तिने हा सर्व प्रकार करण्यास मालेगाव येथील नगरसेवक नदीमोद्दीन याने धमकावल्याचे म्हटले आहे. तसेच त्याने लग्नाचे आमिष दाखवून धमकावल्याचे देखील म्हटले आहे.
----
धस आणि वाघ यांच्यावर देखील आरोप
---
गुन्हा दाखल झाल्यानंतर मला आष्टी येथे नेण्यात आले. तेथे भाजपा आमदार सुरेश धस आणि चित्रा वाघ यांनी माध्यमा समोर कसे बोलायचे याचे ट्रेंनिग दिले असा आरोपही पीडितेने केला आहे. त्यामुळे धस आणि वाघ अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.