Header Ads

मातोरी जि.प.गटातून माऊली पानसंबळ यांनी निवडणूक लढवावी

गटातील नागरिकांची मागणी
----
शिरूर कासार | प्रतिनिधी  

शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती गट, गणाची पुर्नरचना अंतिम टप्यात आहे. त्यातच प्रत्येक गट, गणातून संभाव्य उमेदरांच्या चर्चांना उधान आले आहे. तालुक्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मातोरी जिल्हा परिषद गटातून पै. माऊली पानसंबळ यांच्या नावाला जनतेतून पाठींब वाढत आहे. ते भाजपाकडून या गटात निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गट आणि गणाच्या पुनर्रचनेमुळे जी.प. आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच घोषित होण्याची शक्यता देखील वर्तवली जात असून संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा होऊ लागली आहे. माटोरी गटातून माऊली पानसंबळ यांच्या नावाची चर्चा होत आहे.गेल्या काही दिवसांपासून माऊली पानसंबळ यांनी सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवलेली आहे. सामाजिक कार्यामुळेच  जनतेतून वाढता पाठींबा मिळत असून हेच काम त्यांच्यासाठी संभाव्य काळातील जमेची बाजू आहे. 

शिरूर कासार येथील पै. माऊली पानसंबळ यांनी कोवीड १९ च्या काळात तालुक्यातील वंचित, उपेक्षीत, शोषीत घटकांच्या आडचणी जानल्या. जीवाची तमा नबाळगता समाज घटकात मिळून मिसळून केलेल्या कामाची पावती म्हणून जनतेतून त्यांना पाठींबा वाढत आहे. सातत्याने तालुकास्तरावर विद्यार्थी, खेळाडू, ज्येष्ठ नागरिकांसाठी तालुक्यात केलेल्या समाजकार्याची व्याप्ती वाढल्याने नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीसाठी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी  पानसंबळ यांच्या मातोश्रीस ऊमेदवारी देऊन पै. माऊली पानसंबळ यांना एकप्रकारे कामाची पावती दिली. दरम्यान, नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकीमध्ये निसटत्या पराभवाने खचून न जाता पै. माऊली पानसंबळ यांनी पक्षावरील निष्ठा कायम ठेवत सामाजकार्याचा धडाका सुरूच आहे. युवकांसाठी तालुकास्तरावर कुस्त्यांचा आखाडा, खेळाडूंसाठी क्रिकेटचे टुर्लामेंट, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप, निबंध स्पर्धा आदी सामाजीक उपक्रमांची व्याप्ती वाढत आहे. लॉकडाऊन कालावधीत तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबीयांना किराणा किट, भाजीपाला किट वाटपाचा उपक्रम प्रशंसनीय आहे. त्याच बरोबर लॉकडाऊन कालावधीत आरोग्य कर्मचारी, पोलीस, शिक्षक, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, मदतनीस आदी कोरोना वॉरिअर्सना जवळपास आठ क्विंटल फ्रूट वाटप केले. त्याचबरोबर कोरोना काळात फ्रंट लाईनवर कर्तव्य बजावणाऱ्या तालुक्यातील सफाई कामगांची बोळवण केली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या ध्येय्य धोराणांमध्ये सहभागी होत तालुक्यातील मंदिर, मशिदीसह सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड केली. तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वखर्चातून जनावरांची तपासणी, लसीकण मोहीम राबविली आदी समाजकार्याचा ठसा पै. माऊली पानसंबळ यांनी तालुक्यातील जनतेच्या मनावर उमठवला आहे. समाजकार्याची विकास कामांना सांगड घालण्यासाठी पै. माऊली पानसंबळ यांच्या व्यक्तीमहत्वाला जनतेतून प्राधान्य दिले जात असल्याने पै. माऊली पानसंबळ यांनी मातोरी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी मागणी मातोरी जिल्हा परिषद गटातील नगरिक , मतदारातून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.