एन्काऊंटर | पंजाबी गायक मुसेवाला हत्या प्रकरणातील दोन शार्पशूटर्सचे एन्काऊंटर
अमृतसर | प्रतिनिधी
प्रसिद्ध पंजाबी गायक मुसेवाला यांच्या करणाऱ्या तीन शार्पशूटर्सना पोलिसांनी घेरले असून चार तासांपासून एन्काऊंटर सुरू आहे. यात दोन शार्प शूटर मारले गेले असून एका सोबत अद्यापही फायरिंग चालू आहे,.
पंजाब पोलिसांनी गायक मुसेवाला हत्याप्रकारणातील तीन आरोपींना घेरले असून यातील दोन आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले आहेत. एक आरोपी अद्यापही इमारतीच्या छतावरून पोलिसांवर फायरिंग करत आहे. अटारी सीमेपासून १० की. मी अंतरावर ही चकमक चार तासांपासून सुरू आहे. जगरूप रूपा आणि मनप्रित मन्नू असे मारले गेलेल्या शार्प शूटर्सची नावे आहेत. या चकमकीत तीन पोलिसही ठार झाले आहेत. एक शार्पशूटर अद्यापही इमारतीच्या छतावरून पोलिसांवर गोळीबार करत आहे. २९ मे रोजी मुसेवाला यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत