Header Ads

Your code snippet for mobile
Code snippet for desktop only

सामाजिक वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याची गरज- पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर

शिरूर कासार | प्रतिनिधी

सामाजिक वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी समाजाने पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे.असे  वार्षिक तपासणी निमित्त कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज शिरूर कासार येथे बैठकी दरम्यान मार्गदर्शन पर केले. 

    पहिले पिढीला आई, वडील,गुरुजी युवा पिढीला मार्गदर्शन करायचे मात्र आता मोबाईल द्वारे सोशल मिडिया या युवकांना अधिकचे नकॊ असलेले शिकवत आहे. त्यामुळे युवापिढी भरकटू नये ते वाममार्गाला जाऊ नये म्हणून त्यांच्याशि पालकांनी सुसंवाद ठेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेऊन योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.पोलीस आणि सीमेवरील जवान हे दोन्हीही वर्दीवाले मात्र यांच्यात फरक आहे. सीमेवरील जवानांना त्यांचा शत्रू माहित असतो. कारण जो सीमेचे उल्लंघन करतो तो शत्रू मात्र पोलिसांना या समाजात वावरतांना समोर येणारा व्यक्ती कोण हे माहित नसते. त्यासाठी समाजाने अश्या लोकांची पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे. म्हणजे काही वाईट घडण्याअगोदर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल त्यामुळे पोलिसांना समाजात लपलेले चोर, विघातक कृत्य करणारे माहित होण्यास उशीर होतो. त्यामुळे समाजातील लोकांनी पोलीस पाटलांनी असे माहित असलेले लोक पोलिसांना दाखवून दिले पाहिजेत. म्हणजे या लोकांवर नियंत्रण राहील व समाजात तेढ निर्माण होणार नाही. यासाठी पोलीस व समाजातील लोकांत सुसंवाद गरजेचा आहे. यावेळी पोलीस उप विभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर,पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने,सह पोलीस निरीक्षक डॉ.रामचंद्र पवार,नगराध्यक्ष रोहिदास पाटील,उप नगराध्यक्ष प्रकाश देसरडा, माजी उप नगराध्यक्ष बाबुराव झिरपे, नगरसेवक नसीर शेख, तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष रामनाथ कांबळे, जेष्ठ पत्रकार विजयकुमार गाडेकर, गोकुळ पवार, सतिष मुरकुटे, अंगद पानसंबळ, मनोज परदेशी, संपादक अशोक जायभाये,तालुक्यातील सर्व पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.