Header Ads

Your code snippet for mobile
Code snippet for desktop only

संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा, शिरूरकासार मध्ये शेकडो तरुणांचे धरणे आंदोलन

शिरूरकासार : मराठा आरक्षणा संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर छत्रपती संभाजीराजे हे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शिरूरकासार तालुक्यातील शेकडो तरुणांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

एसबीसीएसमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला शासनाकडून आर्थिक तरतुद करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी  खासदार छत्रपती संभाजीराजे  आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करत आहेत.

आरक्षणाचे जनक असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांना मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाविरोधात आंदोलन करावे लागत आहे.  छत्रपती संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शिरूरकासार मध्ये शेकडो तरुणांनी तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. या आंदोलनात भाजपाच्या नेत्या चंपावती पानसंबळ, माजी सभापती बेदरे, अप्पा येवले, नानासाहेब थिटे, किशोर खोले, संतोष गुजर, कल्याण पवार, कल्याण तांबे, आदी सहभागी झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.