खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतले
सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या
मुंबई :
सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसलेले खासदार संभाजीराजे यांनी उपोषण मागे घेतले आहे. संभाजी राजेंच्या समर्थनार्थ राज्यात ठीक ठिकाणी आंदोलने होत होती.
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेले होते. त्यांनी आज (दि. २८) उपोषण मागे घेतले. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेतली. यावेळी त्यांनी खासदार संभाजी राजे यांना मागण्या मान्य केल्याचे लेखी दिले. एकनाथ शिंदे यांनी या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत