Header Ads

दोन शाळकरी मुलींच्या सतर्कतेमुळे हरवलेल्या त्या बालकाला ओळख पटल्यानंतर केले पालकांच्या स्वाधीन

प्रतिनिधी | शिरूर कासार 

काल दोन शाळकरी मुली शाळेच्या दिशेने जात असताना त्यांना अचानक एक चार वर्षाचा छोटा मुलगा एकटाच रडतांना दिसला त्यांनी तात्काळ आसपास चौकशी केली असता कुणीच त्याला ओळखत नसल्याने शेवटी त्या शाळकरी मुलींनी सदर त्या सापडलेल्या बालकाला शिरूर कासार पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले.

अधिक माहिती अशी की हिंगणगाव ता. गेवराई येथील नंदकिशोर भगवान मदने हे मोहटा देवी येथे दर्शन घेऊन मांगेवाडी येथील आपल्या बहिणीच्या भेटीसाठी आले तिथून मुलांना कपडे घेण्यासाठी शिरूर कासार येथे एका कापडं दुकानात मुलांना कपडे घेत असतांना त्यांचा अवघ्या चारवर्षाचा शाम नावाचा मुलगा त्यांची नजर चुकवून बाहेर येऊन रस्त्याने बाजार पेठेत गेला मात्र पालक कपडे घेण्यात व्यस्त झाल्याने त्यांना लवकर लक्षात आले नाही मात्र तो पर्यंत तो मुलगा रस्त्याने रडत चालल्याचे येथील इयत्ता आठवीत शिकणारी कालिकादेवी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. धनश्री अर्जुन रावताळे व इयत्ता दहावीत शिकणारी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी कु. अक्षरा नंदू भिसे यांना दिसला त्यांनी आसपास चौकशी केली मात्र त्याचे पालक आढळून आले नसल्याने त्यांनी लगेच पोलीस स्टेशन येथे त्या मुलाला घेऊन जाऊन त्यांच्या स्वाधीन केले परस्थितीचे गांभीर्य ओळखुन तात्काळ पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने व त्यांचे पोलीस अंमलदार राहुल नांगरे, डी. एस.बी.चे राज ससाणे, ठाणे अंमलदार मोहन आंधळे, यांनी त्या मुलाचा फोटो वॉट्सअप ग्रुपवर शेअर करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता पालकही त्या मुलाचा शोध घेत असतांना पोलीस कॉ. बिभीसेन गुजरव विधी सेवा समितीचे विधिदूत सतिष मुरकुटे यांना आढळून आले त्यांची कसून चौकशी करून त्यांना पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन सदर बालकाची व त्या पालकांची खातरजमा व ओळख पटवून तालुका बाल संरक्षण समितीचे सदस्य समिर पठाण यांच्या समक्ष पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्या दोन शाळकरी मुलीमुळे त्या हरवलेल्या बालकाना त्यांचे बाळ मिळाल्याने त्यांनी त्या मुलींना बक्षीस देऊन त्यांचे आभार मानले तालुका बाल संरक्षण समिती व पोलीस अधिकारी व स्टापने त्या मुलींच्या तत्परतेचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.