Header Ads

योजना मतांसाठी नव्हे तर ...- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


 लाडकी बहिण योजना मतांसाठी नव्हे तर बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरु केली आहे.  ही योजना बंद पाडण्याची हिम्मत कोणातही नाही, एकबार मैने जो कमिटमेंट कर दि तो,  मै खुद की भी नहीं सुनता., असे म्हणत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्तित करणारांचा समाचार घेतला. 


पाटण तालुक्यातील विविध कामांचे भूमिपूजन व उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधक दुटप्पी असल्याचा ठपका ठेवत हल्लाबोल चढवला. केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाध्यक्ष महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आदींची प्रमुख उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.