Header Ads

अबब .! लाडकी बहीण : स्त्री नव्हे पुरुष, एकाच व्यक्तीचे ३८ अर्ज : पैसेही उचलले

नागपूर : एखादी योजना सरकारने सुरू केली आणि त्यात भ्रष्टाचार होणारच नाही असे महाराष्ट्रात तरी घडत नाही. याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील अपवाद राहिलेली नाही. ही योजना स्त्रीयांसाठी असली तरी या योजनेचा लाभ पुरुषांनी देखील घेतला आहे. एव्हढेच नव्हे तर एकाच व्यक्तीने ३८ अर्ज भरून विविध खात्यांमध्ये पैसे उचलल्याचे उघडकिस आले आहे.

एक व्यक्तीने वेग वेगळ्या नावाने लाडकी बहीण योजनेसाठी ३८ अर्ज केले आहेत. त्याने हे पैसे देखील उचलले आहेत. बँकांना या बाबत काळवून पैसे परत मिळवण्याचे आदेश दिल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

तटकरे यांनी सांगितले की, ज्या व्यक्तींनी फसवून या योजनेचा लाभ  घेतला आहे, ती खाती सील केली जाणार आहेत. तसेच या खात्यावरील शासकीय व्यवहार पूर्णपणे बंद केले जाणार आहेत. १५ ते २० दिवसात छाननीचे काम पूर्ण होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.