प्रतिभा केवळ पैशांच्या अभावी वाया जाऊ नये ,दलित विद्यार्थ्याला आयआयटीला प्रवेश, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा ऐतिहासिक आदेश
नवी दिल्ली :उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील गरीब दलित विद्यार्थी अतुल कुमार आता आयआयटी धनबादमध्ये शिकणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवार, 30 सप्टेंबर रोजी प्रवेश देण्याचे आदेश दिले. प्रवेशासाठी लागणारे शुल्क वेळेत न भरल्याचा ठपका त्याच्यावर ठेऊन त्याचा प्रवेश नाकारण्यात आला होता.
अतुल कुमार या विद्यार्थ्याने प्रथम एससी-एसटी आयोगाकडे अर्ज सादर करून वेळे अगोदरच काही सेकंद प्रवेशाची प्रक्रिया थांबवण्यात आल्याने प्रवेश शुल्क भरता न आल्याने प्रवेश द्यावा अशी विनंती केली होती. मात्र, दिलासा मिळाला नाही. यानंतर विद्यार्थ्याने आधी झारखंड उच्च न्यायालय आणि नंतर मद्रास उच्च न्यायालय गाठले. मद्रास उच्च न्यायालयानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सर्वोच्च न्यायालयाने एका दलित विद्यार्थ्यास एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवले जात आहे. एवढी मोठी प्रतिभा केवळ पैशांच्या अभावी वाया जाता कामा नये, असे म्हणत अतुल कुमार याला प्रवेश दिला जावा, असे आदेश दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत