Header Ads

लाडक्या बहिणीसाठी सामान्य नागरिकाला बसणार झळ

१०० आणि २०० चे बॉण्ड बंद 
----
बीड : विधानसभा निवडणुकीची आचार संहिता १० ते १२ दिवसात लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यसरकार मतदारांना प्रलोभने देणाऱ्या योजना सुरू करत असून लाडकी बहिण योजनेसाठी करोडो रुपये वाटप केले जात आहेत. मात्र, हे पैसे वसूल करण्याचा एक भाग म्हणून आता १०० आणि २०० रुपयांचे मुद्रांक शुल्क (बॉण्ड) बँद केले आहेत. त्या ऐवजी आता ५०० रुपयांचा मुद्रांक शुल्क भरावा लागणार आहे. असे विरोधकांकडून बोलले जात आहे.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा, आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री लाडका भाऊ अशा योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये खर्चून सरकार सवंग लोकप्रियता मिळवत आहे. 
मात्र, या संवग लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिकन तान पडत आहे. हा तान कमी करण्यासाठी आणि महसूल वाढविण्यासाठी मुद्रांक अधिनियमांत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात
आला आहे. या सुधारणांनुसार दस्तप्रकारांमध्ये सोपेपणा व नेमकेपणा आणून व्यवसाय सुलभता आणणे, दर रचनेत सुटसुटीतपणा आणणे यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे. तसेच १०० आणि २०० रुपयांचे बॉण्ड बंद करून ५०० रुपयांचे बॉंड दस्तनोंदणीसाठी लागू करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.