करिअर कट्टा विद्यार्थी संसद शपथविधी सोहळा
विद्यार्थ्यांनी करिअरच्या उद्देशासोबत प्रामाणिक राहिल्यास यश निश्चित मिळते. _ सहाय्यक पोलीस निरीक्षकप्रवीण जाधव
शिरूर कासार (प्रतिनिधी)
दिनांक19 जुलै 2025: येथील कालिकादेवी कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये करियर कट्टा संसदेचे उद्घाटन संपन्न झाले याप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विश्वास कंधारे हे होते तर प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून शिरूर का. पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव हे तर व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय तुपे करिअर कट्टा समन्वयक डॉ.संजय सावते,प्रा.उत्तम महाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना मा.प्रवीण जाधव यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय कसे उच्च असावे आणि ते ध्येय गाठत असताना आपण जिद्द चिकाटी मेहनत अथक परिश्रम जर सातत्यपूर्ण केले तर यश निश्चितच आपल्याला मिळेल. असेही ते यावेळी म्हणाले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास कंधारे म्हणाले की, विद्यार्थ्यांचे आयुष्यामध्ये ध्येय निश्चित असले पाहिजे आपले ध्येय पूर्ण करत असताना करिअर कट्ट्याच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध उपक्रम विद्यार्थ्यांनी अमलात आणले पाहिजेत जर त्यांनी त्या उपक्रमाचा फायदा घेतला तर आपले ध्येय गाठण्यासाठी अधिकचा कालावधी लागणार नाही हे निश्चित आहे. युवकांच्या करिअरला नवीन आयाम देण्याचे काम महाविद्यालयीन जीवनामध्ये करिअर कट्टा करतो असेही याप्रसंगी ते म्हणाले.
करिअर कट्टा विद्यार्थी संसदेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी शपथ ग्रहण केली.
सावन चांदणे- मुख्यमंत्री
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करिअर कट्टा समन्वयक प्रोफेसर डॉ. संजय सावते यांनी केले तर उपस्थितांचे आभार करिअर कट्टा समन्वयक प्रा. उत्तम महाले यांनी मानले.याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत