Header Ads

Your code snippet for mobile
Code snippet for desktop only

धक्कादायक | थायलंडमध्ये लैंगिक घोटाळा : बौद्ध भिक्षूंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश!


बँकॉक | प्रतिनिधी

थायलंडमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, एका महिलेकडून अनेक बौद्ध भिक्षूंना लैंगिक जाळ्यात ओढून त्यांना ब्लॅकमेल केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे थायलंडमधील धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलावान एम्सावत (वय ३५) या महिलेने देशातील नामवंत बौद्ध मठांतील नऊ वरिष्ठ भिक्षूंशी लैंगिक संबंध ठेवले आणि त्याचे फोटो, व्हिडिओ गुपचूपपणे टिपले. या माध्यमातून तिने भिक्षूंना पैशांसाठी धमकावले आणि अंदाजे १०२ कोटी रुपये (३८५ मिलियन डॉलर) कमावले.

पोलिसांच्या तपासानुसार, विलावानच्या मोबाईलमधून सुमारे ८०,००० लैंगिक फोटो व व्हिडिओ हस्तगत करण्यात आले आहेत. याशिवाय, तिच्या ऑनलाइन जुगारात गुंतलेल्या व्यवहारांचाही तपास सुरू आहे.

या प्रकरणामुळे नऊ भिक्षूंना पदच्युत करण्यात आले, तर किमान दोन भिक्षूंना त्यांच्या मठातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. समाजात खळबळ उडवणाऱ्या या प्रकारानंतर सरकारकडून कायद्यात बदल करून अशा महिलांवर फौजदारी कारवाई करण्याच्या दिशेने विचार सुरू आहे. मात्र, यामुळे स्त्रियांनाच दोषी ठरवले जात आहे, असा आरोप महिला हक्क कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे थायलंडच्या धार्मिक संस्थांची प्रतिमा डागाळली गेली असून, लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. धार्मिक संस्था, भिक्षूंना समाजात आदर्श मानले जात असताना, अशा प्रकारचे प्रकरण उघडकीस आल्याने नैतिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही नावे उजेडात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.