Header Ads

फॉरेस्ट रेंजर की खजिन्याचा राजा? ३ कोटींपेक्षा अधिक रोकड, ६ किलोहून अधिक सोनं-चांदी, अनेक मालमत्ता उघड

ओडिशातील कोरापुट जिल्ह्यातील जयपूर (Jeypore) फॉरेस्ट रेंजमधील डेप्युटी रेंजर रामचंद्र नेपाक यांच्या मालमत्तेवर ओडिशा दक्षता विभागाने टाकलेल्या छाप्यांतून प्रचंड बेहिशोबी संपत्ती उघड झाली आहे. शुक्रवारी एकाचवेळी भुवनेश्वर आणि जयपूरमध्ये सहा ठिकाणी कारवाई करताना विभागाने अंदाजे ३ कोटी रुपयांची रोकड, सोने-चांदीसह अनेक घरे व जमीन हस्तगत केली आहे.

दक्षता विभागाने सांगितले की, १.४३ कोटी रुपये रोख, १.३२ कोटींचे बँक ठेवी, १.५ किलो सोने, ४.६३७ किलो चांदी, अशा स्वरूपात बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे. विशेष म्हणजे हे पैसे जयपूरमधील एका फ्लॅटमधील गुप्त तिजोरीत लपवून ठेवण्यात आले होते.

याशिवाय सोन्याची बिस्किटं, नाणी, व किंमती जमीन व घरे आढळून आली आहेत. नेपाक हे पाच महिन्यांनंतर सेवानिवृत्त होणार होते, मात्र तत्पूर्वीच त्यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला.

दक्षता विभागाच्या या कारवाईने राज्यात खळबळ उडाली असून, प्रशासनात असलेल्या काळ्या धनाच्या जाळ्याचे हे केवळ एक उदाहरण असल्याचे अनेकजण सांगत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.