बाळकृष्ण रोडे चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
परळी : रोडे चौक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक सलोखा, समतेचा संदेश देणाऱ्या या जयंती कार्यक्रमानंतर, नुकतेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चा परळी शहराध्यक्षपदी नियुक्त झालेल्या राहुल घोबाळे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्काराने सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरवत सर्वपक्षीय एकतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याची आठवण करून देत, त्यांच्या साहित्य व सामाजिक योगदानाचा गौरव केला.
त्यानंतर नवनिर्वाचित शहराध्यक्ष राहुल घोबाळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी रिपाई (अ) चे तालुकाध्यक्ष शरण मस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे केशव गायकवाड, काँग्रेसचे विश्वनाथ गायकवाड, रिपाई एकतावादीचे शहराध्यक्ष सुनील कांबळे, बहुजन विकास मोर्चा शहराध्यक्ष मनोहर मुंडे,सुरेश रोडे, वंचित बहुजन आघाडीचे सचिन रोडे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष समी शेख, शहर चिटणीस जितेंद्र मस्के यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यशपाल मुंडे, रवी मुळे, प्रदीप भोकरे, सुभाष वाघमारे, भगवान गायकवाड, अमर सूर्यवंशी, योगेश मुंडे, सुधीर वाघमारे, हरिभाऊ बनसोडे, बाबा कांबळे, अनिस शेख, नाना भिसे, राहुल पैठणे, रणजीत सरवदे उपस्थित होते.
भीमवाडी मित्र मंडळाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. जयंती आणि सत्कार सोहळा एक सामाजिक सौहार्द आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत