Header Ads

Your code snippet for mobile
Code snippet for desktop only

अण्णा भाऊ संघर्ष करायला शिकवतात: डॉ सुधीर माने


महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात: प्राचार्य विश्वास कंधारे 

शिरूर कासार :  “ज्यांच्या पोटात भुकेची आग आहे, त्यांच्यासाठीच माझं लेखन आहे.” हा वास्तववादी विचार मांडणारे अण्णाभाऊ साठे संघर्ष करायला शिकवतात असे प्रतिपादन सुधीर माने यांनी कालिकादेवी महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने इंग्रजी विभाग आणि वांग्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानात केले. ते पुढे बोलताना म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठी साहित्य एका विशिष्ट दिशेने जात असताना अण्णाभाऊंनी वास्तववादी लेखन करत समाजाला परिवर्तनाची दिशा दिली. अण्णाभाऊंची साहित्य माणसाला जगायला शिकवते. कारण अण्णाभाऊंचे साहित्य वाचणारा कधीच निराश होऊ शकत नाही. त्यांच्या साहित्यात सन्मान, समता, बंधुता आणि न्याय पाहायला मिळतो. अण्णाभाऊंचा वाटेगाव ते रशियाचा प्रवास सरांनी उलगडला. तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य विश्वास कंधारे यांनी अण्णाभाऊांच्या जीवनकार्याचे सामाजिक तसेच साहित्यिक महत्त्व अधोरेखित केले. 

या व्याख्यानाचे सूत्रसंचालन डॉक्टर रमेश लाहोटी यांनी केले तर प्रास्ताविक वांग्मय मंडळ अध्यक्ष डॉ. रमेश लांडगे मांडले.  उपस्थितांचे आभार इंग्रजी विभाग प्रमुख राजभाऊ कोरडे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.