नवाब मलिकांविरोधात1.25 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा
दावा दाखल करणारे समीर वानखेडेंचे वडील
मुंबई / प्रतिनिधी
एनसीबीचे विभागीय वादग्रस्त संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्याविरोधात 1.25 कोटी रुपयांचा दावा कोर्टात दाखल केला आहे.
समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात गेली काही दिवस सातत्याने आरोप प्रत्यारोप चालू आहेत. ट्विटर वरील पोस्ट बरोबरच पत्रकार परिषदांमधून मलिक सातत्याने आरोप करत असल्याचे दिसत आहेत. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांच्या जात प्रमाणपत्रावर त्यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी घातली जावी यासाठी ज्ञानदेव वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्शद शेख या वकिलांच्या माध्यमातून दाद मागितली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत