मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत