मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल
मुंबई / प्रतिनिधी
मान आणि पाठीच्या दुखण्याने त्रस्त असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर छोटी शस्रक्रिया देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे ते पुढील ३-४ दिवस रुग्णालयातच असतील असे सांगण्यात आले आहे.
मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गिरगावच्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज विविध वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांचे रिपोर्ट आजच संध्याकाळी येणार आहेत. हे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डॉक्टर रिपोर्ट तपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील.
वरिष्ठ डाक्टरांचा एक लहान शस्रक्रिया करण्याचा सल्ला आहे. मात्र शस्त्रक्रिया करायची की नाही, याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुट॒बींयांशी चर्चा करून घेतील, अशी माहीती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे ते पुढील ३- ४ दिवस रुग्णालयात राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत