स्वतःचं प्रकरण दाबण्यासाठी मलिकांचं प्रकरण काढलं
मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी कारवाई का केली नाही ? -----
प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
मुंबई /प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर गंभीर आरोप केले आहेत. मलिकांचे अंडरवर्ल्डटसोबत संबंध असल्याचं फडणवीस म्हणाले होते. त्यावरूनच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. "स्वतःचं प्रकरण दाबण्यासाठी मलिकांचं प्रकरण काढलं' असं आंबेडकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मलिकांनी जमीन घेतल्याची माहिती होती. त्यावेळी त्यांनी हे प्रकरण समोर का आणले नाही. स्वतःचं प्रकरण दाबण्यासाठी मलिकांचं प्रकरण काढलं. आपल्यावर शेकल्या जाते त्यावेळी त्या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी दुसरी माहिती द्यायची. आपल्यावर झालेले आरोप दाबण्यासाठी फडणवीसांनी हे सर्व केलं आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कारवाई का केली नाही?" असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला.
आता न्यायालयाची भूमिका महत्वाची आहे. न्यायालयाने फडणवीसांवर दाखल असलेले सर्व प्रकरणं निकाली काढावे, असंही आंबेडकर म्हणाले.
फडणवीसांचे नेमके आरोप काय?
"नवाब मलिकांनी कुर्ला येथे कवडीमोल भावात जमीन खरेदी केली आहे. ही जमीन सरदार खान आणि सलीम पटेल यांच्याकडून खरेदी केली आहे. खान हा मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहे, सलीम पटेल हा दाऊदची बहीण हसीना पारकरचा महत्वाचा माणूस होता. मुंबईच्या हत्याऱ्यांकठून मलिकांनी जमीन का खरेदी केली? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता.
दरम्यान, मलिकांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून ळावळे आहेत.
कुठल्याही बॉम्बब्लास्ट प्रकरणातील आरोपीकडून मी जमीन खरेदी केलेली नाही. मी केलेला व्यवहार अचूक आहे, असं स्पष्टीकरण मलिक यांनी दिलं.
मुंबईच्या हत्यारांकडून मालिकांनी जमीन का खरेदी केली? असा सवाल मालिकांनी केला होता.
उत्तर द्याहटवाअसे चुकीचे वाक्य आलेले आहे
दुरुस्त करावे.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवादुरुस्ती होत नसेल तर ठीक आहे.यात आपली चूक नाही.
हटवासलीम पटेलचे दाऊदची बहीण हसीना प्रकारचा महत्वाचा माणूस होता.
उत्तर द्याहटवाहे वाक्य योग्य वाटत नाही.
ल या अक्षरा ऐवजी ळ अक्षर
उत्तर द्याहटवाआले आहे
ok
उत्तर द्याहटवा