मागील जन्मी पाप केलेला माणूस साखर कारखाना किंवा वर्तमानपत्र काढतो - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
मुंबई / प्रतिनिधी
मागील जन्मी पाप केलेला माणूस साखर कारखाना काढतो किंवा वर्तमानपत्र काढतो. असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत एका सहकारी बँकेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले.
सध्या साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. सहकार क्षेत्र काळानुसार बदलायला हवे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे. सध्या कारखाने नफ्यात आहेत. मात्र, पुढील काळ कठीण असेल असेही गडकरी म्हणाले.
कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करावी
साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर इथेनॉल निर्मिती केली पाहिजे.इथेनॉल निर्मिती झाल्यास पेट्रोल साठी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. आज डिझेल पेट्रोलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आल्या तर पेट्रोल डिझेल कोणीही घेणार नाही असेही गडकरी म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत