एसटी कर्मचाऱ्याच्या समर्थनार्थ काढलेल्या वंचित आघाडीच्या मोर्चास चांगला प्रतिसाद
शिरूरकासार / प्रतिनिधी
एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे आज(दि.17) शिरुर कासार येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास चांगला प्रतिसाद मिळाला.
अनेक वर्षांपासून कामगारांच्या मागण्या रखडलेल्या आहेत. प्रत्येक वेळी एसटी तोट्यात असल्याचे सांगितले जाते, परंतु महामंडळाच्या बसेस पूर्ण भरून चालतात. त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे हे मान्य होण्यासारखं नाही. ते नफ्यातच असते ,मात्र, राजकारणी त्यास तोट्यात दाखवतात. महाराष्ट्र शासनाने कामगारांशी बोलून त्यांचा प्रश्न तात्काळ सोडवावा व मागण्या मान्य कराव्यात. एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे आज(दि.17) शिरुर कासार येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चास चांगला प्रतिसाद मिळाला. बाजार तळावरून मोर्चास सुरुवात होऊन जिजामाता चौकातुन मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तेथे मान्यवरांची भाषणे झाली.मागण्या मान्य होई पर्यंत वंचित बहुजन आघाडी एसटी महामंडळ कामगारांसोबत राहणार असल्याचे वंचित आघाडीचे युवा नेते चंद्रकांत औसारमल यांनी सांगितले. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर मोर्चाचे विसर्जन करण्यात आले. मोर्चात जिल्हाउपाध्यक्ष दादासाहेब तासतोडे, चंद्रकांत औसरमल, दिलीप माने, मनोहर औसरमल, कृष्णा थोरात, लक्ष्मण गायकवाड, रामनाथ सुरवसे, लतीफ सय्यद, आदी उपस्थित होते.
धन्यवाद
उत्तर द्याहटवा