एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा,वंचित आघाडी तर्फे आज शिरुर येथे मोर्चा
शिरूरकासार | प्रतिनिधी
एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे आज(दि.17) शिरुर कासार येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचितचे युवा नेते तथा तालुका महासचिव मनोहर औसारमल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
औसरमल यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून कामगारांच्या मागण्या रखडलेल्या आहेत. प्रत्येक वेळी एसटी तोट्यात असल्याचे सांगितले जाते, परंतु महामंडळाच्या बसेस पूर्ण भरून चालतात. त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे हे मान्य होण्यासारखं नाही. ते नफ्यातच असले पाहिजे असे आम्ही गृहीत धरतो. महाराष्ट्र शासनाने कामगारांशी बोलून त्यांचा प्रश्न तात्काळ सोडवावा व मागण्या मान्य कराव्यात. एसटी महामंडळ कामगारांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे आज(दि.17) शिरुर कासार येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मागण्या मान्य होई पर्यंत वंचित बहुजन आघाडी एसटी महामंडळ कामगारांसोबत राहणार आहे. प्रसिद्धी पत्रकारावर जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब तासतोडे, चंद्रकांत औसारमल, दिलीप माने, मनोहर औसारमल, कृष्णा थोरात, लक्ष्मण गायकवाड यांच्या सह्या आहेत.
धन्यवाद
उत्तर द्याहटवावंचित बहुजन आघाडी शिरूर कासार
कार्यकारिणी आपले आभारी आहोत.
welcome
उत्तर द्याहटवा