व्यंगचित्रकार दीपक महाले यांना चित्रभूषण पुरस्कार
येथील व्यंगचित्रकार दीपक महाले यांना कलाक्षेत्रातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चित्रभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. लोककला कलावंत साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरण समारंभ नुकताच वडाळा महादेव ता. श्रीरामपूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक बाबूराव उपाध्ये होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक स्नेहप्रकाशचे संपादक श्री प्रकाश कुलथे हे उपस्थित होते. दीपक महाले व्यंगचित्रकार असून विविध वृत्तपत्रे, दिवाळीअंक इत्यादी नियतकालिकातून त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित होतात. व्यंगचित्रकला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कथा ,कविता, लेख इत्यादी लेखनातूनही दीपक महाले यांनी ठसा उमटवला आहे. लोककला कलावंत साहित्यिक परिषद ,महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष कवी बाबासाहेब पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. पत्रकार राजेंद्र देसाई, भाऊसाहेब भोंडगे यांची यावेळी उपस्थिती होती. पुरस्काराबद्दल दिपक महाले यांचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत