भाजपाच्या अॅड. भाग्यश्री ढाकणे यांच्याकडून महिलांना साडीचोळी व मुलांना फराळ
भटक्या समाजाच्या पालावर दिवाळी भेट
शिरूर कासार / प्रतिनिधी
काखेत झोळी घेऊन सतत भिक्षुकी करत हे गांव ते गांव फिरून उदरनिर्वाह करणा-या भटक्या समाजातील डौरी गोसावी समाजाच्या थेट पालावर जाऊन भाजपाच्या भटक्या विमुक्त समाज युवती प्रदेशाध्यक्षा अॅड भाग्यश्री ढाकणे यांनी बुधवारी महिलांना साडी चोळी व त्यांच्या मुलांना खाऊचे पुडे वाटप करून दिवाळी साजरी केली .
पिढ्या पिढ्या हा समाज भिक्षुकी करून उपजिविका भागवत आहे गेली सात आठ दिवसांपासून या समाजाचा मुक्काम शिरूर येथील तहसिल कार्यालया समोरील डोंगर परिसरात पालावर आहे ,त्यांचीही दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने भाग्यश्री ढाकणे यांनी अल्पसा प्रयत्न केला. यावेळी भटक्या समाजातील कुटूंब प्रमुखांनी आपल्या व्यथा सांगताना आमच्या मुलांना शिक्षण व नोकरी प्रामुख्याने मिळाली पाहिजे तसेच अन्य सुविधा शासनाने उपलब्ध करून द्याव्यात असे सांगितले ,सतत भटकंती नशिबी असल्याने शिक्षणात मोठा अडथळा येत असतो तर मुलीच्या शिक्षणाला तर कायमचा फाटा मिळत असल्याचे सांगितले ,शासन दरबारी आपण याबाबत दाद मागु असे भाग्यश्री ढाकणे यांनी सांगितले .
यावेळी गोकुळ पवार ,चंद्रकांत राजहंस ,सतिष मुरकुटे यांची उपस्थिती होती .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत