Header Ads

Your code snippet for mobile
Code snippet for desktop only

फेक न्यूज } पाकिस्तानच्या विजया नंतर आनंदोत्सव



श्रीनगर मेडिकल कॉलेजच्या १०० विद्यार्थ्याची डिग्री रद्द

सोशियल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये मुस्लिम पोशाखातील महिलांचे छायाचित्र आहे. पोस्ट मध्ये दावा करण्यात आला आहे की, भारत पाकिस्तान मॅच मध्ये पाकिस्तान विजयी झाल्यानंतर श्रीनगर मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या या घोषणा देणार्या १०० जणांच्या पदव्या ( डिग्री ) सरकारने रद्द केल्या आहेत. पाकिस्तानच्या विजयाचा आनंद मानणाऱ्यांना  UAPA  कायद्यानुसार सात वर्षांची शिक्षा झाली आहे.
---
सत्य काय आहे ?
---
 ● पोस्ट मध्ये असलेल्या फोटोचे सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही हा फोटो गूगल लेन्स वर सर्च केला.
 ● सर्च रिझल्ट मध्ये हा फोटो तीन वर्षा पूर्वीचा असल्याचे दिसून आले.
 ● clarionindia.net या वेबसाईटवरचा हा फोटो आहे.
 ● या वेबसाईटनुसार हा फोटो उत्तर प्रदेशातील खोडा येथील मुलींच्या शाळेचा आहे.
 ● २०१७ मध्ये हा फोटो प्रसिद्ध झालेला आहे.
 ● ज्या बातमीपत्रात  हा फोटो आहे.  त्याचे शीर्षक ‘Rasta’ Shows Poor Muslim Girls The Path To Education ( 'रस्ता'गरीब मुस्लिम मुलींना मार्ग दाखवते ) असे आहे.
 ● आमच्या पडताळणीत हि पोस्ट खोटी म्हणजेच फेक असल्याचे दिसून आले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.