फडणवीसांच्या अडरवर्डशी संबंधाचा उद्या पर्दाफास करणार
----
फडणवीसांच्या आरोपावर मालिकांचे उत्तर
----
मुंबई / प्रतिनिधी
नवाब मालिकांचे अंडरवर्डशी संबंध आहेत. त्यांनी मुंबईतील महागडी जमीन अंडरवर्डशी संबंधीत व्यक्तीकडून खरेदी केली आहे,असा आरोप विधान सभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रकार परिषदेत केल्यानंतर मालिकांनी देखील त्यास उत्तर दिले असून अडरवर्डचा खेळ तुम्ही सुरू केला तो आम्ही पूर्ण करु असे म्हणत आव्हान दिले आहे.
देवेन्द्र फडणीविसांचे फटाके भिजलेले आहेत.त्यांना माहिती देणारा खेळाडू कच्चा आहे. फडणवीसांनी अडरवर्डचा खेळ सुरू केला आहे, पण तो आम्ही पूर्ण करु. उद्या सकाळी 10 पर्यंत वाट पहा. अडरवर्डचा हायट्रोजन बॉम्ब फोडणार आहे.
काय म्हणाले होते फडणवीस ?
कुर्ल्यामध्ये २.८० एकर म्हणजेच १ लाख २३ हजार स्क्वेअर फूटची जागा जिला गोवावाला कंपाऊंड असं म्हटलं जातं. कुर्ल्यात एलबीएस रस्त्यावर ही जागा आहे. या जमिनीची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली. मरियमबाई गोवावाला, मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर आहे. विक्री करणारा सरदार शहावली खान आहे. म्हणजे या दोघांनी मिळून या जमिनीची विक्री सॉलिडस कंपनीला केली. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबियांची आहे. घेणाऱ्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे. या सॉलिडसमध्ये २०१९मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते. आजही त्यांच्या कुटुंबाचे लोक त्यात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत