इंग्लंड } १०० महिलांच्या मृत शरीराशी दुष्कृत्य
इंग्लंडच्या ईस्ट सक्सेस राज्यात १०० महिलांच्या मृत शरीरासी (शव ) दुष्कृत्य करणारे प्रकरण ३४ वर्षांपूर्वी घडले होते. त्यातील आरोपीस कोर्टाने आता दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्याला कोणती सजा सुनावली जाईल या कडे लक्ष लागले आहे.
३४ वर्षांपूवी डेविड फुलर याने इंग्लंडच्या ईस्ट सक्सेस राज्यात १०० महिलांच्या मृत शरीरासी (शव ) दुष्कृत्य केले होते. डेविड फुलर आता ६७ वर्षांचा आहे. तो १२ वर्षापर्यंत महिलांच्या शवासी दुष्कृत्य करत होता. त्याने जवळपास १०० महिलांच्या सहवासही दुष्कृत्य केले. परंतु या बाबत कोणासही माहिती झाली नव्हती.
फुलर १२ वर्ष हीथफिल्ड रुग्णालयात इलेकट्रीशियन म्हणून काम करत होता. रात्री उशिरापर्यंत तो रुग्णालयात थांबायचा. शवगृहातील कर्मचारी निघून गेल्यानंतर तो मूत महिलांच्या शरीरासी दुष्कृत्य करायचा. या प्रकरणाच्या तपासासाठी इंग्लंड पोलिसांना २.५ मिलियन युरो (२१. करोड) रुपये खर्च आला आहे.
----
प्रकरण कसे उघडकीस आले?
-----
१९८७ मध्ये नेलं आणि कैरोली पिअर्स या दोन महिलांची हत्या करण्यात आली होती. या हत्यांचा तपास करताना या महिलांच्या शरीरात फुलरचे डीएनए आढळून आले होते. फुलरच्या घराच्या तपासणीतही अश्लील साहित्य मिळून आले होते. अधिक तपास करताना शवासी फुलर दुष्कृत्य करीत असल्याचे उघड झाले.
लेख आवडला लेखनाचा फाँट अप्रतिम आहे
उत्तर द्याहटवा