Header Ads

Your code snippet for mobile
Code snippet for desktop only

छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संघटना एस टी कर्मचाऱ्यांसोबत, संपाला पाठिंबा

शिरूरकासार / प्रतिनिधी


आठ-दहा दिवसांपासून एस.टी. कर्मचा-यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपाला येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संघटनेने पाठिंबा देऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे निवेदनाद्वारे सांगितले आहे .


रात्र ,दिवस,सण,वार यांचा कुठलाही विचार न करता एस.टी. महामंडळाचे चालक,वाहक काम करत असतात मात्र त्या तुलनेत त्यांना मोबदला मिळत नाही,रोज रोख जमा करून आपली जबाबदारी पार पाडणा-यांना संपावर जाऊनही न्याय मिळत नसल्याने आता सर्वस्तरातून या संपाला पाठिंबा मिळत आहे मंगळवारी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फय्याजभाई शेख यांनी पाठिंबा म्हणून तहसिल व पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे यावेळी व्यापारी दुकानदार प्रकाश देसरडा,गणेश गायकवाड,माहि शेख,बाबा आत्तार,प्रकाश भांडेकर,गोकुळ पवार,युवराज सोनवणे,शरद पवार,पांडूरंग थोरात,रियाज शेख,निलेश ललवाणी,दादा तळेकर,बाळु पठाडे,संदिप गाडेकर,तुकाराम कातखडे,अमर माळी,ज्ञानेश्वर गाडेकर,सचिन माळी आदी उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

हा ब्लॉग शोधा

Blogger द्वारे प्रायोजित.